Alandi मध्ये Indrayani ला पुर-पालखी सोहळा प्रमुखांनी वारकऱ्यांना Alandi मध्ये न येण्याचं आवाहन

07 Jul 2026    91 Views

Alandi मध्ये Indrayani ला पुर-पालखी सोहळा प्रमुखांनी वारकऱ्यांना Alandi मध्ये न येण्याचं आवाहन

वारी म्हणजे फक्त पालखीचा प्रवास नाही; वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांचा श्वास, टाळ-मृदंगाचा नाद आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर. वारकरी थांबले, तर फक्त रस्ते रिकामे दिसणार नाही तर त्या पालखीतला आणि वारीतला आत्मही दिसणार नाही इतकं महत्त्व वारकऱ्यांचं या पालखी सोहळ्यात आहे पालखी सोहळ्याचं प्रस्थान हे माऊली महाराजांच्या मंदिरातून हजारो वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या घोषात होत असत पंचक्रोशीतील लोक माऊली महाराजांच्या मंदिरातून पालखीला प्रस्थान करून देण्यासाठी मोठ्या भक्ती भावाने जमत असतात या वर्षी मात्र पहिल्यांदाच वारकऱ्या विना भक्ताविना या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि हे सगळं घडलंय या पावसामुळे आषाढी वारीची सुरुवात ही प्रस्थान सोहळ्याने होत असते आणि हा प्रस्थान सोहळा आळंदीत आणि देहूत होत असतो उद्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सोहळा असेल आणि परवा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे..

खर तर पुढचे 28 दिवस पालखी मुक्काम करत करत पुढे प्रस्तान ठेवत असते मात्र पहिल्या दिवशी देहुतून तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान आणि आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचा प्रस्थान हे मानाचा मानलं जातं आणि म्हणूनच या प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून देखील लोक अगदी भक्ती भावाने यासाठी आळंदीत आणि देहुत आलेले असतात
मात्र आता वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना आळंदीत येऊ नका असं आवाहन केलंय पावसाच्या रौद्ररूपामुळं वारकऱ्यांच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये हा उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनामागे आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाने वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये असं आवाहन का केलं आहे?
आळंदीमध्ये नक्की परिस्थिती काय आहे?वारकऱ्यांच्या जीविताला खरंच धोका उद्भवू शकतो? का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत कारण वारी हा फक्त एक उत्सव नाही तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा कळस आहे


जूनचा संपूर्ण महिना पावसानं महाराष्ट्र सहित संपूर्ण देशाला ओढ दिली होती मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संत धार चालू आहे कालपासून या पावसानं अक्षरशः रौद्ररूप धारण केलं असं म्हणता येईल किनारपट्टी भागात खास करून मुंबई आणि लगतच्या भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय काहीसा तसाच प्रकार पावसाने घाटमाथ्यावर देखील केला यामुळे नद्यांना असलेल्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली मावळ आणि मुळशी मध्ये देखील मोठा पाऊस सुरू आहे लोणावळा परिसरात देखील पावसाचे तांडव सुरू आहे त्यामुळे लोणावळा कुरवंडे मधून उगम पावणाऱ्या इंद्रायणी ला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे या पावसामुळे सोबतच इंद्रायणी वर असणाऱ्या वडीवळे धरण क्षेत्रात मोठा पाऊस होत असल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.


इंद्रायणी आपला प्रवास देहु नंतर आळंदी असा करते तिच्या काठावर असणाऱ्या देह आणि आळंदी या दोन्ही तीर्थस्थळावरून आता पंढरपूरकडे पालख्या जातात यासाठी राज्यभरातून भावीक मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदी मध्ये जातात आणि या संतांच्या पालख्यान सोबत पंढरपूरकडचा प्रवास सुरू करतातमात्र यावेळी ची परिस्थिती ही थोडीशी कठीण आहे पावसानं गेल्या तीन-चार दिवसात केलेल्या तांडवामुळे नदीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय त्यामुळे इंद्रायणी नदीवर असणाऱ्या धरणा मधून देखील विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे इंद्रायणी मधील पाण्याची पातळी वाढली आहे अजूनही घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यात अजूनही मोठी वाढ होऊ शकते वारीसाठी आलेले भावीक इंद्रायणी मध्ये आवर्जून स्नान करतात मात्र नदीच्या पाण्याची वाढलेली पातळी पाहता भाविकांच्या म्हणजेच वारकऱ्यांच्या जीविताला आला धोका उद्भवू शकतो यासाठीच आता प्रशासनाकडून आणि मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी मोठा आवाहन केलंय आपण सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी काय आवाहन केलंय ते पाहूयात
देवेंद्र फडणवीस म्हणाले...

इंद्रायणी ची वाढ पातलेली पाणीळी पाहता वारकऱ्यांच्या जीवित आला काही धोका उद्भवू नये त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वारकऱ्यांनी पुण्यातच थांबावं पालखीने  प्रस्थान केल्यानंतर ती पुण्यातच येणार आहे त्यामुळे जे वारकरी आळंदी कडे निघालेले आहेत त्यांनी आळंदी मध्ये प्रवेश न करता पुण्यातच मुक्काम करावासोबतच आळंदी देवस्थानाच्या पालखी सोहळा प्रमुखॲड. राजेंद्र उमाप यांनी देखील वारकऱ्यांना आवाहन केलं आहे

सर्व वारकरी भाविकांना नम्र आवाहन करण्यात येतंय की इंद्रायणीला पुर आल्याने सर्व पुल पाण्याखाली गेलेत.सध्या आळंदीत येन सुरक्षित नाही.तुम्ही जर आळंदीकडे निघाले असाल तर आहेत तिथेच थांबा. आळंदी मंदिर प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

सध्या आळंदी इंद्रायणी नदी परिसरात पोलीस, नगरपरिषदेचे कर्मचारी असून इंद्रायणी नदी पात्राजवळ कोणीही येऊ नये असा सूचना दिल्या जात आहेत. दुतर्फा नदी घाट पाण्याखाली गेला असून शनिमंदिरा वरील भागात पाणी आली आहे. सिद्धबेट परिसरात पाणी आले आहे. माऊली बागपरिसरात पाणी आले असून  इंद्रायणी घाटावरील भाविकांसाठी असणारी चेंजिंग मंडप व्यवस्था वाहून गेली आहे. नदी काठ जवळील दुकानदामध्ये पाणी घुसल आहे यांमुळे च सुरक्षेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल 
1)पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल,

2)चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल, 

3)सिद्धबेट परिसरातील पूल 
4)पीएमपीएल बस स्थानकाशेजारील नवीन पूल 

असे चारही पूल तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेतली आहे. सोबतच प्रशासनाकडून वारकर्यांना आणि स्थानिका आवाहन हि करण्यात आली आहेत


1)कोणीही इंद्रायणी नदीपात्राकडे अथवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये.
2) बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये
3) सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,
4) अफवांवर विश्वास ठेवू नये
5)  अधिकृत सूचनांचे पालन करावे, 

पुल आणि मार्गांवर अक्षरशः बॅरिकेड लावून ते दळणवळणासाठी बंद करण्यात आलेले आहेत  केंद्रे महाराज मठामध्ये देखील पाणी शिरले होते.या मठामध्ये २० पोलीस कर्मचारी आणि ४ इतर नागरिक, असे एकूण २४ जण अडकले होते. आळंदी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणी तातडीने बचावकार्य करत आपत्ती व्यवस्थापन कक्ष ला याबाबत माहिती देऊन संबंधितांना वाचवण्यात आलं आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने अत्यंत कौशल्याने लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि रोप  यांच्या साहाय्याने सर्व २० पोलीस कर्मचारी आणि इतर ४ नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले. सर्वजण आता पूर्णपणे सुरक्षित आहेत.सोबतच बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.यासोबत पुरामुळे गोशाळा देखील बाधित झाली होती या गोशाळेतील  १५० गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
स्थानिक प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य आता  युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.त्यामुळेच वारकर्यांनी आता प्रशासनाच्या आवाहनाला गंभीरपणे घेण्याची गरज आहे सोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये