Ganesh कारखान्याची निवडणूक लढवणार नाही-Ahilyanagr मधील Sujay Vikhe यांची घोषणा
11 Jul 2026 92 ViewsGanesh कारखान्याची निवडणूक लढवणार नाही-Ahilyanagr मधील Sujay Vikhe यांची घोषणा
2023 मधील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विखे पाटील यांच्या पॅनल चा दारुण पराभव झाला होता.त्यानंतर प्रवरा कारखाना आणि गणेश कारखाना या दोहोंमध्ये झालेल्या कारारावरून विखे पाटील न्यायालयात गेले.आणि आता सुजय विखेंनी आपण भविष्यात गणेश कारखाना निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केलीय.याचा सहकार क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो.हेच जाणुन घेणार आहोत
एखादा नेता एखाद्या निवडणुकीत आपला पराभव झाल्यावर जेव्हा आपण पुढची निवडणूक लढवणार नाही असं घोषित करतो तेव्हा त्यानं या त्यागाला कितीही मोठं लेबल लावलं तरी त्यामागे आपली कमी झालेली ताकद त्याला स्पष्ट दिसत असते आणि म्हणूनच पुन्हा हस व्हायला नको म्हणून त्याज मी निवडणुकीच्या रिगणात उतरणार नसल्याचं घोषित केलेलं अस हे मी आता सांगण्याचं कारण म्हणजे अहिल्यानगर मधून माजी खासदार राहिलेले आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आता आपण भविष्यात गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे 2023 मध्ये या कारखान्याची निवडणूक झालेली ज्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांच्या पॅनलला सपाटून पराभव स्वीकारावा लागला होता विखे पाटील हे अहिल्या नगरच्या राजकारणातलं सगळ्यात मुरब्बी आणि मोठं घराणं असताना देखील या साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे पाटलांचा पॅनल फक्त एक जागा जिंकू शकला होता त्या पार्श्वभूमीवरच आणि अहिल्यानगर मध्ये गेल्या काही कालावधीत ज्यांनी विखे पाटलांचा पराभव केला त्यांना राज्य भाजपकडून ज्या पद्धतीने बळ दिल जात आहे त्या घटना पाहता सुजय विखे पाटील यांच्या विधानाला मोठं वजन प्राप्त होतं त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मी लढवणार नाही असं का म्हटलं?त्यांची त्यामागची राजकीय गणित काय सांगतात?आणि भविष्यात याचा काय परिणाम होऊ शकतो?या सगळ्या गोष्टींवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत
सहकार क्षेत्र...राज्याच्या ग्रामीण भागात जर तुम्हाला राजकीय जम बसवायचा असेल तर सहकार क्षेत्र शिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच राज्यात आणि अगदी देशातही मोठ-मोठी पद भूषवलेली अनेक मातब्बर चेहरे हे आपल्याला विभागातील सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांमध्ये दिसतात मग ते सहकारी बँकांची निवडणूक असो सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो किंवा सहकारी दूध संस्थांची निवडणूक या प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागातले मुरब्बी चेहरे स्वतः किंवा आपल्या पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उतरवतात त्याचं कारण अगदी सोपं आहे तुमची सहकारावर जितकी जास्त पकड तितकं तुमचं राजकीय भविष्य आणि राजकीय बार्गेनिक पावर मोठी होते अहिल्यानगर देखील याला अपवाद नाही विखे पाटील घराणं अहिल्यानगरचं या अहिल्यानगर मधील राहता येथे असणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या मागील झालेल्या निवडणुकीत याच दृष्टिकोनातून विखे कुटुंब उतरलं होतं इथं 19 जागांसाठी निवडणूक झालेली या कारखान्याच्या निवडणुकीत एका बाजूला विखे पाटील कुटुंबीय होते ज्यांनी आठ वर्षे हा कारखाना चालवला होता तर दुसऱ्या बाजूला कोल्हे घराणं होतं होय तेच कोल्हे घराणं ज्या घरातले विवेक कोल्हे आता भाजपकडून विधान परिषदेवर आमदार आहेत या कोल्हेंच्या सोबतीला आले होते ते काँग्रेसचे असणारे बाळासाहेब थोरात सोबत त्यांना साथ मिळाली होती ती काँग्रेसच्या धडाडीच्या तोफ अशी ओळख असणाऱ्या प्रभावती घोगरे यांची या निवडणुकीत विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनी गणेश परिवर्तन पॅनल उतरवला होता.
तर विखे पाटलांनी जनसेवा पॅनल उतरवला होता मात्र या निवडणुकीत गणेश परिवर्तन पॅनल ने 19 पैकी 18 जागा जिंकत कारखान्यावर आपलं वर्चस्व स्थापन केलं तिथंच मतदारांनी विखे पाटलांना मात्र या निवडणुकीत नाकारला खरंतर या कारखान्यावर त्या अगोदर विखेंचीच सत्ता होती किंवा कारखाना विखेंच्या हातात होता असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल विखे पाटलांचं असं म्हणणं होतं की हा कारखाना तोट्यात होता म्हणून प्रवरा साखर कारखान्याकडून करार पद्धतीवर हा गणेश साखर कारखाना आठ वर्षांसाठी चालवायला घेण्यात आला 2014 मध्ये तसा करार करण्यात आला होता...
यावर सुजय विखे पाटील यांचे म्हणणं असं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव हा कारखाना चालवायला घेतला मात्र या कारखान्याच्या मशिनरी जुन्या असल्यानं उत्पादनावर मर्यादा येत त्यासाठीच दरवर्षी या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली आणि उत्पादन वाढवण्यात आलं. हा करार 2023 ला संपणार होता मात्र मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळे हा करार वाढवून मिळावा यासाठी विखेंच्या वतीने 2022 मध्येच राज्य सरकारकडं हा करार वाढवण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आला जो तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने फेटाळून लावला मात्र नंतर भाजपचं सरकार आल्यानंतर या कारखान्याचा करार वाढवण्यात आला. आम्ही या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना उत्तम दर दिला आम्ही कारखान्याचे उत्पादन देखील वाढवलं असं सुजय विखे पाटील यांचे म्हणणं आहे थोडक्यात प्रवरा येथील कारखान्यासोबत श्री गणेश कारखान्याचा करार होता मात्र निवडणुकीत विखेणी एवढे कष्ट घेऊन हि सभासदांनी त्यांना नाकारलं नंतर निवडून आलेल्या नव्या संचालक मंडळाने प्रवरा सोबत झालेला गणेश कारखान्याच्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या विरोधात विखे हे साखर आयुक्तांकडे गेले त्यानंतर हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलंआणि तदनंतर ज्यांच्यामुळे हे प्रकरण वाढलं किंवा ज्यांच्यामुळे मातब्बर विखे पाटलांना कोर्टात जावं लागलं त्या विवेक कोल्हे याना भाजप कडून विधानपरिषदे मिळाली कोल्हे घरं देखील कोपरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आणि वजनदार राजकिय घराणे आहेत विवेक कोल्ह्यांच्या आई देखील भाजपकडून आमदार होत्या आणि आता विवेक कोल्हे देखील..
विवेक कोल्हेंच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दा खातर विधानसभेला माघार घेतलेली त्यावेळी योग्य वेळी तुमचा विचार करू असा शब्द फडणवीस यांनी दिला होता आणि आपल्या शब्दाला जागत त्यांनी कोल्हेंना विधान परिषदेवर संधी दिली. विखेंसाठी या गोष्टी थोड्याशा धक्कादायक आहेत कारण विखे स्वतः देखील भाजपमध्ये आहेत मात्र असं असतानाच भाजप श्रेष्ठींकडून त्यांच्याच विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न अहिल्यानगर मध्ये होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी यामुळेच आता आपण गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरणार नाही अशी थेट भूमिका बोलून दाखवली इतक्यावरच थांबले नाही तर आपले कार्यकर्ते देखील या निवडणुकीत उतरणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी लढत होतो हे पालूपद देखील आपल्या विधानाच्या पुढे जोडायला सुजय विखे पाटील विसरले नाहीत
विखे पाटलांनी जर या कारखान्याची निवडणूक लढवली नाही तर पुढे या कारखान्यावर कोल्हेची एक हाती सत्ता राहू शकते मात्र यामुळे एक गोष्ट होईल की इतके दिवस अहिल्यानगर मध्ये विखे पाटील यांच्या नावाचा जो दबदबा होता त्या दबदब्याला या साखर कारखान्यांन सुरुंग लावला... इतकच नाही तर विखे पाटील स्वतः भाजपचे आहेत आणि भाजपच्याच लोकांकडून त्यांचा या कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झालाय आणि गंमत म्हणजे यासाठी काँग्रेसचे नेते या भाजपच्या लोकांच्या हातात हात घालून लढत होते
यावरून एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे जर एका साखर कारखान्यासाठी बाळासाहेब थोरात प्रभावती घोगरे कोल्हे अशी मातब्बर मंडळी विखेंच्या विरोधात एकत्र येऊ शकतात तर भविष्यात हे विरोधक विखेंच वर्चस्व पुसण्यासाठी देखील एकत्र का येणार नाहीत?