Maharashtra : Heavy Rain Alert Triggers Safety Advisory- या जिल्ह्यांनी सावध राहा!

06 Jul 2026    93 Views

 सावधान 6 तारखेपर्यंत घराच्या बाहेर पडू नका! नाही नाही मी घाबरवत नाही आहे तर प्रशासनाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहचवत आहे...पाऊस कधी पडणार उकाड्याने जीव गेला म्हणणारे लोक आता पावसा थांब रे अशी विनवणी करत आहेत. गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेली पावसाची बॅटींग थांबावयचं नाव घेत नाही आहेत. शाळेला सुट्या मिळाल्या असल्या तरी ऑफिसला मात्र जाव तर लागतच अशात फिरायला जाणंही धोक्याचं आहे ही विसरू नका...पण 6 तारखेपर्यंत बाहेर पडू नका असं प्रशासन का सांगत आहे. काय खबरादारी घ्यायची आहे काय म्हणतोय मेघराज...कशी असणारी त्याची 2 दिवसाची सवारी चला बोलुयात... 


राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे, तर डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. काही भागांत नदी-नाले धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत, तर प्रशासनही सतर्क झालेलं आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येत नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ६ तारखेपर्यंत हवामान खात्याकडून देण्यात आलेले सर्व इशारे आणि राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचं नागरिकांनी गांभीर्याने पालन करावं. विशेषतः डोंगराळ भाग, नदीकाठची गावं आणि पूरप्रवण भागातील नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाचं स्वरूप पाहता सरकारचा हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण गेल्या काही तासांत अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, पुढील दोन दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मग हवामान खात्यानं नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट दिला आहे? सध्या राज्यात पावसाची नेमकी परिस्थिती काय आहे? आणि पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज काय आहे? 


•    महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असून पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
•    हवामान विभागाकडून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी.
•    ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे रेड अलर्ट.
•    विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज.

याचसंदर्भता माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
 राज्यासह मुंबई महानगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे-नाशिक जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. कालपासून शासनाकडून लोकांना वेगवेगळे अलर्ट देण्यात आलेले आहेत. विशेषतः या भागात ६ तारखेपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस असेल. वादळही येऊ शकते, अशाप्रकारचे अलर्ट दिलेले आहेत. काही भागात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होईल, अशी शक्यता आहे. राज्य शासनाकडून मुसळधार पाऊस असलेल्या भागांना दर तीन तासांनी एसएमएसद्वारे अलर्ट देत आहोत. नागरिकांनी हे अलर्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. पावसामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी लोकांना प्रवास टाळण्याची विनंती केली आहे. सातही ठणकराचा जनक हेही वाचा रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सतर्कता; चार तासांत सरासरी ४९.५० मिमी पाऊस, दुपारी उधाण भरतीचा इशारा एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांनी शासनाचे अलर्ट पाहूनच शक्यतो घराबाहेर पडावे.
असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

कोकण विभाग
•    गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सलग पाऊस.
•    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – ऑरेंज अलर्ट.
•    ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर – रेड अलर्ट.
•    पुढील 48 तास धोक्याचे.
•    सखल भागांत पाणी साचले.
•    काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना.
•    अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन.
पश्चिम महाराष्ट्र
•    पुणे व सातारा घाटमाथा – रेड अलर्ट.
•    कोल्हापूर घाटमाथा – ऑरेंज अलर्ट.
•    पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता.
•    काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता.
•    नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
मराठवाडा
•    छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर – यलो अलर्ट.
•    40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
•    विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज.
उत्तर महाराष्ट्र
•    नाशिक घाटमाथा – रेड अलर्ट.
•    धुळे, नंदुरबार आणि नाशिक – ऑरेंज अलर्ट.
•    जळगाव – यलो अलर्ट.
•    अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता.
•    झाडाखाली थांबू नये व विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
विदर्भ
•    गोंदिया, वाशीम आणि यवतमाळ – ऑरेंज अलर्ट.
•    अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा – यलो अलर्ट.
•    जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा इशारा.
•    काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.