Nagraj Manjule च्या Khashaba Jadhav टिझर प्रदर्शित-Youtube वर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
06 Jul 2026 96 ViewsNagraj Manjule च्या Khashaba Jadhav टिझर प्रदर्शित-Youtube वर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
कोल्हापूरच्या कुस्तीला जागतिक ओळख आणि ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवून देणारे पहिलवान खाशाबा जाधव.. नुसतं नाव जरी घेतलं तरी आजही लाल मातीतले पैलवान हाबुक ठोकायला लागतात.. भारताच्या इतिहासात कुस्तीला पहिल मेडल खाशाबा जाधव यांनी मिळवून दिल.. पण आज ही त्या कुस्तीची त्या ऑलम्पिक मेडल ची गोष्ट त्यामागचा संघर्ष हा प्रत्येकाला माहित नाही. आणि म्हणूनच ऑलिंपिक सारख्या अंतरराष्ट्रीय खेळामध्ये कुस्तीला मानाचे स्थान मिळवुन देणारे खाशाबा जाधव कसे घडले? आणि मेडल पर्यंत कसे पोहोचले? हे चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. आपल्या आजवरच्या चित्रपटातून सामाजिक आशय जतन करणाऱ्या नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.आणि लवकरच हा चित्रपट आता आपल्या भेटीला येणार आहे पण कसा असणार आहे हा चित्रपट?
कोल्हापूरच्या लाल मातीला ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवून देणारे पहिलवान खाशाबा जाधव.. नुसतं नाव जरी घेतलं तरी लाल मातीतले पैलवान हाबुक ठोकायला लागतात.. भारताच्या इतिहासात कुस्तीला पहिल मेडल मिळालं आणि ते खाशाबा जाधव यांनी मिळवून दिल.. पण आज ही त्या कुस्तीची त्या ऑलम्पिक मेडल ची गोष्ट त्यामागचा संगर्षं हा प्रत्येकाला माहित नाही आणि म्हणूनच ऑलिंपिक सारख्या अंतरराष्ट्रीय खेळामध्ये कुस्तीला मानाचे स्थान मिळवुन देणारे खाशाबा जाधव कसे घडले आणि मेडल पर्यंत कसे पोहोचले हे चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येणार आहे आपल्या आजवरच्या चित्रपटातून सामाजिक आशय जतन करणाऱ्या नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि लवकरच हा चित्रपट आता आपल्या भेटीला येणार आहे पण कसा असणार आहे हा चित्रपट?
कधी येणार आहे रसिकांच्या भेटीला?
आणि खाशाबा जाधव यांचा संघर्ष काय आहे?हेच आपण पाहणार आहोत
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी साताऱ्यातील गोळेश्वर या छोट्याशा गावात एका पैलवानाच्या घरात झाला. घरातले शेंडेफळ असणाऱ्या खाशाबाला लहानपणापासून खेळण्याची फार आवड होती. पोहोणे, कुस्ती, कबड्डी, धावणे या सगळ्याच गोष्टी त्याला आवडत आणि त्यात तो पटाईतही होता. कुस्तीचे सुरुवातीचे धडे तर त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतले होते वयात येईपर्यंत त्यांचं नाव आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसिद्ध झाले होते पुढे खाशाबा जाधव महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूर मध्ये आले तिथं शिक्षन सुरू असतानाच त्यांनी ऑलम्पिक च स्वप्न पाहिले आणि त्यासाठी मेहनत करून त्यांनी १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी प्रवेश मिळवला.
या जाण्यायेण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करून पैसा गोळा करावा लागला होता. कारण घरची परिस्थिती इतकी सक्षम न्हवती त्यात मॅट वर खेळ करणे भारतात नवीनच होते त्याची तयारीही करावी लागनार होती. असंख्य अडथळे होते मात्र त्यावर मात करून त्यांनी लंडन ऑलम्पिक मध्ये सहावे स्थान मिळवल होत मात्र त्याचवेळी त्यांनी निश्चय केला की पुढच्या ऑलम्पिक मध्ये पदकाला गवसणी घालायचीच
त्यानंतर सुरू झाला प्रवास तो 1952 मध्ये finland ची राजधानी हेलसंकी मध्ये होणाऱ्या पंधराव्या ऑलम्पिक मध्ये पदक मिळवण्याच्या स्वप्नांचाखाशाबा जाधव यांनी या स्पर्धेत प्रवेश मिळवला खरा पण पुन्हा आर्थिक अडचण आ वासून उभी राहिली पहिल्या ऑलम्पिक साठी कोल्हापूर च्या महाराजांनी मदत केलेली यावेळी पुन्हा स्पर्धेसाठी खाशाबा जाधव यांना याचना करावी लागणार होत.
त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले व निधी जमवला. घरच्या लोकांनी त्यांना पैसे गोळा करण्यासाठी मदत केली. राज्य सरकारकडे वारंवार मदत मागितल्यानंतर त्यांना चार हजारांची मदत दिली गेली.मात्र, तरीही पैसे कमी पडत होते. अशा वेळी त्यांनी आपले घर आपल्या कॉलेजच्या प्राचार्याकडे गहाण ठेवले. यानंतर त्यांच्या प्राचार्यांनी त्यांना सात हजार रुपयांची मदत केली.कोल्हापूर च्या मराठा बँकेने देखील त्यांना 3000 रुपयांची मदत केली होती त्यावर अखेर 1952 मध्ये खाशाबा हेलासंकी ला पोहोचले.या स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी दणक्यात सुरवात केली होती सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी कॅनडा, मेक्सिको, आणि जर्मनी यांसारख्या बलाढ्य देशांच्या मल्लांना सामोरे जात पहिले पाच सामने सलग जिंकले. विशेष म्हणजे, हे पाचही सामने त्यांनी अवघ्या ५-५ मिनिटांपेक्षा कमी वेळात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करून जिंकले होते।पहिले पाच सामने जिंकल्यानंतर खाशाबांचा सामना जपानच्या अव्वल पैलवान शोहाची इशी याच्याशी झाला. हा सामना तब्बल १५ मिनिटे अत्यंत चुरशीचा चालला. खाशाबांनी इशीला तगडी टक्कर दिली, परंतु पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयामुळे आणि केवळ १ गुणाच्या फरकाने खाशाबांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यांचा पुढचा सामना सोव्हिएत युनियनच्या रशीद मम्मदबेओव्ह याच्याशी होता. खरतर आधीच्या सामन्याने खाशाबा प्रचंड थकलेले होते नियमनूसार, दोन मोठ्या लढतींमध्ये खेळाडूला कमीत कमी अर्ध्या तासाची विश्रांती मिळणे आवश्यक असते. परंतु, जपानच्या मल्लाविरुद्ध १५ मिनिटे सलग लढून दमलेल्या खाशाबांना हातपाय सरळ करायलाही वेळ न देता लगेचच पुढील सामन्यासाठी मॅटवर बोलावण्यात आले त्यावेळीत्यांच्या बाजूने लढण्यासाठी किंवा विश्रांतीची मागणी करण्यासाठी तेथे कोणताही भारतीय क्रीडा अधिकारी उपस्थित नव्हता. या थकलेल्या अवस्थेत खेळताना रशीदने खाशाबांचा पराभव केला आणि रौप्यपदक पटकावले या दोन्ही पराभवांमुळे खाशबांची सुवर्ण किंवा रौप्य पदकाची संधी हुकली असली, तरी आधीच्या सामन्यांमधील कामगिरीच्या जोरावर खाशाबा जाधव यांनी तिसरे स्थान पटकवत ब्राँझ पदक मिळवलं आणि ऑलम्पिक च्या इतिहासात भारतासोबतच स्वतःचं नाव देखील सुवर्ण अक्षरात नोंदवल् हे पदक भारतासाठी फार महत्वाच होत कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करत कुस्तीसारख्या खेळत करियर करता येत देशाचं नाव मोठं करता येत हे खाशाबा यांनी सिद्ध केलं होतं त्यांच्या या पदकाने देशातील कुस्तीचा चेहरा बदलला अस म्हणायला हरकत नाही.
फिनलँड वरून जेव्हा ते मायदेशी परतले आणि कराड रेल्वे स्थानकावर उतरले तेथून त्यांना आपल्या गावी गोळेश्वर ला न्हेण्यासाठी 151 बैलगाड्या आणि ढोल ताश्यांच्या गजरात हजारो माणसे आली होती....
पण पुढे दुर्दैवाने खाशाबा जाधव यांना भारतात कर्तृत्ववान व्यक्तींना जिवंतपणी अवहेलना सिद्ध करावी लागते या नियमाचा प्रत्यय आला पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांना कशीबशी नोकरी मिळाली. आपल्या निवृत्तीनंतर गावात तालीम बांधण्याचा मानस असताना, त्यांचे 1984 मध्ये अपघाती निधन झाले.जिवंतपणी त्यांची उपेक्षा झाली नंतर महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर ‘शिवछत्रपती’, तर केंद्र शासनाने ‘अर्जून’ पुरस्काराने गौरवले.दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्टेडियमला के. डी. जाधव कुस्ती संकुल नामकरण करण्यात आले आहे. 2001 पासून त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासन कुस्ती स्पर्धा भरवत आहे.पण त्याचं गावात तालीम बांधण्याच स्वप्न मात्र अपुरे च राहिले त्यांचे पुत्र रणजित जाधव यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले २००९ मध्ये, रणजित यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ क्रीडा संकुल बांधण्यासाठी कराडच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाला अर्ध्या एकराहून थोडी जास्त जमीन दिली होती.
त्यावेळी क्रीडामंत्र्यांनी गोळेश्वर येथे कुस्ती संकुल बांधण्याची घोषणा केली.2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 1 कोटी 58 लाख मंजूर केले जाधव कुटूंबाने स्वतःची जागा देऊनही अनेक वर्षे प्रशासकीय अनास्थेमुळे आणि अपुऱ्या निधीमुळे संकुलाचे काम रखडले होते. या विलंबामुळे उद्विग्न होऊन रणजित जाधव यांनी २०१७ मध्ये एक मोठा निर्णय जाहीर केला जर सरकार कुस्ती संकुल उभे करणार नसेल, तर आमच्या वडिलांचे ऑलिम्पिक पदक लिलावात काढून मिळणाऱ्या पैशातून आम्ही संकुल उभारू, नाहीतर शासनाने आमची जागा आम्हाला परत करावी.यानंतर शासनाकडून 3 कोटी मंजूर केले गेले ग्रामपंचायत यासाठी जागा देणार होती मात्र जागेवरून पुन्हा काही प्रश्न उभे राहिले आणि हा प्रोजेक्ट बालगळाला 2024 मध्ये पुन्हा या संकुलसाठी वाढीव रक्कम मंजूर करण्यात आली असा प्रवास हा खाशाबा जाधव यांचा राहिला आहे.त्यांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला तो हि प्रतिकूल परिस्थितीत मात्र जिवंतपणी आणि नंतर हि त्यांना उपेक्षा सहन करावी लागलीआता नागराज मंजुळे हे याचा खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट काढतायेत जो जानेवारी महिन्यात रिलिझ होईल अस सांगितलं जातं य या चित्रपटात स्वतः कोल्हापूर चे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भुमिका केल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून संगीतल्यामुळे तर उत्सुकता अजूनच वाढली आहे या सोबतच आपल्या माईल स्टोन चित्रपट फँड्री मधून सोमनाथ अवघडे सैराट मधून आकाश ठोसर या नवोदितांना संधी देणारे नागराज मंजुळे यावेळी खाशबांच्या चित्रपटातून कोणाला संधी देतायत याची उत्सुकता देखील आहे कारण टिझर मध्ये नायकाचा चेहरा दाखवलेला नाहीय सोबतच त्याबद्दल चित्रपटाच्या टिम कडून देखील गुप्तता पाळली गेलीय.