NCP Sharad Pawar गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ- Pruthviraj Chavhan यांचा दावा
10 Jul 2026 95 ViewsNCP Sharad Pawar गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ- Pruthviraj Chavhan यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत....मोदी शहा सरकार त्यांच्या मागे हात धुऊन लागलेत... ते भाजप मध्ये जातील की एकनाथ शिंदे गटात यावर मला भाष्य करायचं नाहीय..हे विधान केल आहे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी..
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली त्याला कारण होत राज्यात एकनाथ शिंदेंनी नुकतेच ऑपरेशन टायगर पार पाडत उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या गटात आणलं य त्यानंतर दबक्या वाजत सुरू असणारी ऑपरेशन तुतारी ची चर्चा आणि अश्यात त्यानंतर इंडियन एक्स्प्रेस मध्ये शरद पवार गटाच्या काँग्रेस विलीनीकरण वर प्रसिद्ध झालेले आर्टिकल...
या सगळ्या गोष्टींचा सहसंबंध बघता ncp शरद पवार गटात नक्की चाललय काय?असा प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात उपस्थित होतो..त्यामुळेच ncp मध्ये नक्की चाललय काय?
आणि काय होऊ शकत भविष्यात या सर्वांवर आपण पुढची काही मिनिट बोलणार आहोत..
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याने नुकतीच खळबळ उडवून दिलीय..पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला त्यामध्ये ते नक्की काय म्हणाले हे अगोदर पाहुयात
पृथ्वीराज चव्हाण म्हणालेशरद पवार गटाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत.परिस्थिती चिंताजनक आहे.काय करतील माहिती नाही.त्यांच्यामागे मोदी शहा सरकार हात धुऊन लागलेल आहे.त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाहीय..जे उद्धव जिच्या शिवसेनेचे झाले.ते पवार साहेबांच्या पक्षासोबत होऊ शकत..ते भाजप मध्ये जातील की एकनाथ शिंदे गटात जातील का?
हे मला माहिती नाही.ते सोडून जातील की नाही.कल्पना नाही.पण ते अस्वस्थ आहेत इतकं नक्की..
पृथ्वीराज चव्हाण..काँग्रेसचे जेष्ठ नेते...आजपर्यंत कुठल्याही वादात आणि विनाकारणच्या चर्चेत न अडकलेल नाव.. ते आजपर्यंत कुठल्याही राजकीय गदारोळात फारसे शक्यतो अडकले नाही आणि त्यामुळेच त्यांच्या या दाव्याला अर्थ प्राप्त होतो. खरंतर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या वाटेवर आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात चालू होत्या काही कालावधीपूर्वी याच अनुषंगाने ऑपरेशन तुतारी होणार अशा चर्चा माध्यमांमध्ये ही रंगल्या होत्या अशातच इंडियन एक्सप्रेस ना एक आर्टिकल प्रसिद्ध केलं होतं चार एनसीपी शरद पवार गट काँग्रेसमध्ये मर्ज होण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत असं म्हटलं होतं तर याला सोनिया गांधी देखील अनुकूल असल्याचा दावा केला होता मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तथा राहुल गांधी शरद पवारांबद्दल थोडेसे सांसक असल्याचे बोलणं केलं होतं जिथे शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या हालचाली करतात तिथेच त्यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे भाजपबरोबर जाण्यासाठी उत्सुक असल्याच्या बातम्याही पुढे येत होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला गर्भित अर्थ आहे
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावला
शशिकांत शिंदे म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या सर्व चर्चांना शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ते म्हणाले कालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत.चर्चांमध्ये तथ्य नाही: एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही विषय उद्भवू शकत नाही.आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू,
तर खासदार बजरंग सोनवणे म्हणाले
Text
आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाहीये. आम्ही आठ खासदार एकसंघ आहोत. आम्ही सर्व जण सुप्रिया ताईंच्या नेतृत्त्वात सभागृहात काम करतो. आदरणीय साहेबांच्या आदेशानं, सहकार्यानं काम करतो. आम्ही ऑफरच्या पलीकडे आहोत, त्यामुळं आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही, असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. आम्ही आठच्या आठ जण एकत्र आहोत.
थोडक्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार यांनी आम्ही कसे पक्षाशी एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र आपण शरद पवार गटाचे खासदार आणि गेल्या काही कालावधीतल्या चर्चा यांचा जर अभ्यास केला तर सध्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील खासदार
1)सुप्रिया सुळे : बारामती
2)अमोल कोल्हे : शिरुर
3)धैर्यशील मोहिते पाटील: माढा
4) सुरेश म्हात्रे : भिवंडी
5) 5)अमर काळे : वर्धा
6) निलेश लंके : अहमदनगर दक्षिण
7) बजरंग सोनवणे : बीड
8) भास्कर भगरे : दिंडोरी
या खासदारांपैकी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.ऑपरेशन तुतारीच्या पार्श्वभूमीवर या भेटीच्या अनुषंगाने चर्चा सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा केला.सोबतच ते अस हि म्हणालेले काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी लक्ष्य केले जाऊ शकते, मात्र आमचे खासदार पक्षासोबत ठामपणे राहतील. सीमांकन प्रक्रियेसाठी भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज आहे. पण अशा प्रकारच्या घडामोडी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यातून रोहित पवारांनी सोनावणेची खिंड लढवली खरी मात्र भाजप ला सिमाकन विधेयकासाठी म्हणजेच खासदार संख्या वाढवण्यासाठी विधेयक पास करायला बहुमताची गरज आहे आणि त्यासाठी खासदारांना लक्ष केलं जाऊ शकत याची कबुली देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे दिली..तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत देखील मोठा दावा गेल्या काही कालावधीत केला जातोय ते म्हणजे सुप्रिया सुळे nda म्हणजेच भाजप सोबत जायला उत्सुक आहेत...
सुप्रिया सुळेंनी थेट असा दावा कधी केलेला नसला तरीही त्यांची गेल्या काही कालावधीतली गोष्टी पाहता सुप्रिया सुळे या भाजपच्या तितक्याशा विरोधात नाही किंवा त्यांना भाजपला तितकाचा विरोध करायचा नाहीये असं हे दिसून आलं त्यांच्या मुलीच्या लग्नात अगदी भाजपचे मोठे मोठे नेते सोबतच आरएसएस चे प्रमुख मोहन भागवत आणि उद्योजक गौतमातांनी देखील होते टोक आहेत ज्यांच्या विरोधात प्रचार करून ज्यांच्या विरोधात आपल्याला लोकशाही वाचवायचे आहे असं मनात सुप्रिया सुळेंनी मताचा जागर मागितला होता आणि त्या खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या मात्र असं असताना ज्या लोकांच्या विचारधारेच्या विरोधात मी उभी आहे असे त्यांनी मतदारांना भासवलं त्याच लोकांना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कार्यक्रमांमध्ये जागा देईल त्यामुळे शरद पवारांचे इतर खासदार कदाचित भाजपमध्ये नंतर जातील मात्र सुप्रिया सुळे इतर सर्वच खासदारांच्या तुलनेत भाजपला अनुकूल आहे असेच यावरून म्हणता येईल
शरद पवार गटाचे खासदार पक्ष सोडणार हा पृथ्वीराज चव्हाण यांचा संशय हा महत्वाचा अश्यासाठी ठरतो कारण ncp च3 धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील काही कालावधी पूर्वी असाच दावा केला होता
Ncp अजित पवार गटाच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाच्या खासदारांवर टिप्पणी केली होती ते म्हणाले होते
प्रत्येकाला विकासकामे करूनच परत यायचे आहे. १२ डिसेंबरपर्यंत किमान पाच लोकसभा खासदार आमच्याकडे येतील. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांच्या मतदारसंघात विकास घडवून आणण्यासाठी त्यांना आमच्याकडे यावे लागेल, हे त्यांच्या लक्षात आले आहे.त्यामुळे सातत्याने शरद पवारगटाच्या खासदारांबाबत या अनुषंगाने चर्चा पुढे येत आहेत असेच म्हणावे लागेल..