डॉक्टरांना मारहाम करणारे Ramesh Mhatre यांच्यावर Shrikant Shinde कारवाई करणार?

09 Jul 2026    93 Views

डॉक्टरांना मारहाम करणारे Ramesh Mhatre यांच्यावर Shrikant Shinde कारवाई करणार?

असं म्हणतात की डॉक्टर देवस्तात डॉक्टर ही पदवी म्हणून रुग्णांची सेवा करण्यासाठी कमीत कमी चार ते पाच वर्ष घालवावे लागतात पण याच डॉक्टरांनी फक्त फोन न उचलण्याच्या कारणामुळे त्यांना जर मारहाण होत असेल आणि ती महाराज लोकप्रतिनिधी समजले जाणाऱ्या लोकप्रतिनिधी करत असतील तर मी काय म्हणत आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल मी बोलत आहे कल्याण मधील रमेश मात्र यांच्या वायरल झालेल्या हॉस्पिटलमध्ये एका व्हिडिओ बद्दल जिथे त्यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहेत कोण आहेत हे रमेश म्हात्रे सिने डॉक्टरांना मारहाण केली त्याचं कारण नेमकं काय होतं यानंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण कितपत योग्य हेच  बोलूयात


बुधवारी कल्याणमध्ये  Indian Medical Association च्या सर्व सदस्यांनी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागातील रुग्णालये तसेच खासगी दवाखाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. आता हा निषेध नेमका कशासाठी होता? तर शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुक्या म्हात्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली.
आता या नगरसेवकांनी नेमकं असं काय केलं होतं? तर रमेश म्हात्रे यांनी Shastrinagar Hospitalमधील वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केली होती. हो... बरोबर ऐकलंत... डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


ही मारहाण का झाली? तर कल्याण पश्चिमेतील कोपर रोड परिसरातून एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोनोग्राफीमध्ये बाळाची नाळ गळ्यात अडकल्याचं निदर्शनास आलं. प्रसूती यशस्वी झाली, मात्र नवजात बाळाला पुढील उपचारांसाठी एनआयसीयूची गरज होती. रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी बाळाला मुंबईतील लोकमान्य टिळम मुन्सिपल हॉस्पिटल येथे हलवण्याचा सल्ला दिला.
यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांशी वाद झाला. त्यांनी स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि डॉक्टरांशी बोलण्याची विनंती केली. रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी फोन उचलला नाही. याच रागातून रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात पोहोचले आणि डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास घडला.
याहून धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की रमेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबतचे काही कार्यकर्ते डॉक्टरांना मारहाण करत आहेत. एका महिला डॉक्टर फोनवर बोलत असताना त्यांच्या हातावर जोरात मारून मोबाईल खाली पाडण्यात आला. "आमचं म्हणणं आधी ऐका," अशी दमदाटी आणि अरेरावीही केल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.


या घटनेनंतर डॉक्टरांनी आंदोलन छेडलं आणि तब्बल २२ तासांनंतर रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी समोर येत आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. "मी डॉक्टरांवर हात उचलला नाही. त्या डॉक्टर मला माझ्या मुलीसारख्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर हे स्पष्ट होईल," असं ते म्हणाले. "महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या. आमच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यामुळे त्यांचा मोबाईल खाली करण्यासाठी मी हात पुढे केला आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या, एवढंच सांगितलं," असं स्पष्टीकरण देत त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.


मात्र याहून आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेचं समर्थनही काही ठिकाणी केलं जात आहे. डोंबिवली परिसरात रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण करणं कसं योग्य होतं, अशा आशयाच्या पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या कृतीचं समर्थन करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर कल्याणमधील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून निषेध नोंदवला असून रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

पीडित रुग्ण महिलेची आई साधना कारंडे यांनीसायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही डॉक्टरांना विनंती केली की रस्त्यांवर पाणी साचले आहे, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात पोहोचायला अनेक तास लागतील. माझ्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचे सांगून तिची प्रसूती तिथेच करण्याची वारंवार विनंती केली. आम्ही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा विनवण्या केल्या, पण त्यांनी नकार देत तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे, आम्ही नगरसेवकांना फोन करुन घटनेची माहिती दिली. 


या घटनेचे पडसाद  विधिमंडळातही उमटले. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर आवाज उठवत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच रमेश म्हात्रे यांचं नगरसेवकपदही रद्द करण्याची मागणी केली. आता या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असताना आणि नागरिकांकडून संताप व्यक्त होत असताना, श्रीकांत शिंदे यांनीही याबद्दल ट्विट करत या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
कोण आहेत रमेश म्हात्रे?

रमेश सुक्या म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली परिसरातील जुने स्थानिक राजकीय नेते आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ते दहावी उत्तीर्ण असून अकरावी नापास आहेत. त्यांनी डोंबिवली (पूर्व) येथील सरस्वती हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी 21 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या विरोधात तीन फौजदारी गुन्हे नोंद आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. मध्यंतरी मोकाशी पाड्यातील माजी पोलीस पाटील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलगा प्रशांत मोकाशी याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता...मात्र, हे सर्व खटले सध्या न्यायालयात प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. रमेश म्हात्रे यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावले होते. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती राहिले आहेत.