Sangali-Satara निवडणुकीत Dhairyashil Kadam विजयी-पण Jayant Patil मत फोडण्यात यशस्वी
22 Jun 2026 99 Viewsराज्यात नाशिक नंतर सर्वात चर्चेत राहिलेली सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झालाय.इथं विजय जरी महायुतीचा झाला असला तरी जयंत पाटलांनी मात्र निवडणुकीत शंभर मतं फोडून महायुतीला जशास तसे उत्तर दिले.. जयकुमार गोरे जे सोलापूर सांगली सातारा च्या राजकारणामध्ये भाजपचा सगळ्यात आघाडीचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले होते त्याच जयकुमार गोरे यांच्या होमपिचवर जयंत पाटलांनी मात्र त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवला आहे.जयंत पाटलांनी फक्त या निवडणुकीत मते फोडलेली नाहीत.तर त्यांनी त्यांच्यावर प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने लागलेला आरोप हि धुऊन काढला आहे.नक्की काय रणनीती शिजली या प्रकरणात हेच जाणुन घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांत..