Air India Building च्या 23व्या मजल्यावर होणार CMO कार्यालय , ₹200 कोटींची बचतही होणार!

01 Aug 2026    1 Views

नरिमन पॉइंट येथील मुंबईतील प्रतिष्ठित 'एअर इंडिया' इमारत आता महाराष्ट्र सरकारचे एक प्रमुख प्रशासकीय केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण करणार आहे. या इमारतीच्या २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्याधुनिक 'सीएमओ' (CMO) कार्यालय असेल, तर २२ व्या मजल्यावर मंत्रिमंडळाची आधुनिक बैठक-कक्ष (कॅबिनेट हॉल) असेल. सरकारवरील सुमारे २०० कोटी रुपयांचा भाड्याचा बोजा कमी करणे आणि विविध विभागांना एकाच छताखाली आणणे, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. सरकारी कार्यालये तिथे हलवण्यापूर्वी या ऐतिहासिक इमारतीचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट), तसेच दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे कामही केले जाणार आहे.