अण्णासाहेब महामंडळाचा वाद पेटला! Narendra Patil vs Vijay Deshmukh; सरकारलाच थेट आव्हान |
09 Aug 2026 14 Viewsअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कर्ज आणि व्याज परतावा योजनांचा लाभ मराठा समाजातील तरुणांना मिळण्यात अडथळे निर्माण करणाऱ्या जाचक अटी असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महामंडळाच्या कारभारावर आणि योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.