भाजपचा हक्काचा बालेकिल्ला हातातून जाणार का?
02 Aug 2026 1 Views"भाजपचा हक्काचा बालेकिल्ला हातातून जाणार का? बिहारच्या बँकीपूरमधून एक्झिट पोलने असा दावा केला आहे की, ज्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेची चर्चा सुरू झाली आहे." "विशेष म्हणजे, हा दावा फक्त एका संस्थेचा नाही. Vote Vibe, Poll Pandit आणि Rudra Research/DV Research या तीन वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये प्रशांत किशोर यांनाच आघाडीवर दाखवण्यात आलं आहे." भाजपचा बालेकिल्ला ढासळणार का? बँकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर मोठा उलटफेर करणार का? बिहारच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या बँकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एक्झिट पोलने खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर जाणून घेणार आहोत की, बँकीपूरमध्ये पोटनिवडणूक का लागली, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे, भाजपसाठी ही जागा इतकी प्रतिष्ठेची का मानली जाते आणि नितीन नवीन यांचं या मतदारसंघाशी नातं काय आहे. तसेच, Vote Vibe, Poll Pandit आणि Rudra Research/DV Research या तीन वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये नेमका कोणाला आघाडी दाखवण्यात आली आहे? प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने खरंच भाजपला मोठं आव्हान उभं केलं आहे का? अलीकडील आंदोलनांचा मतदानावर काही परिणाम झाला का? आणि हे सर्व अंदाज कितपत विश्वासार्ह मानायचे? टीप: एक्झिट पोल हे मतदानानंतरचे अंदाज असतात. अंतिम निकाल मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार