Chakan News: 20 उद्योग गाशा गुंडाळणार? 1,000 कोटींची उलाढाल आणि 4 हजार कामगारांचे भवितव्य धोक्यात!

13 Aug 2026    17 Views

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC परिसरातील औद्योगिक पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची खराब अवस्था, वाढती वाहतूक कोंडी, वीजपुरवठ्यातील अनियमितता आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे चाकणमधील तब्बल २० लघुउद्योग सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCमध्ये स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.या उद्योगांचे एकत्रित वार्षिक उलाढाल सुमारे १,००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, या स्थलांतरामुळे जवळपास ४ हजार रोजगारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकण MIDCमधील औद्योगिक वातावरण आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.