Devendra Fadnavis केंद्रीय मंत्री नाही तर थेट सर्वोच्च समितीत! फडणवीसांचा दिल्लीत मोठा गेम प्लॅन?
26 Aug 2026 19 Viewsदिल्लीच्या जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनानंतर भाजप राष्ट्रीय पातळीवर मोठे संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत आहे. भाजपची सर्वोच्च अन् सर्वात ताकदवर मानल्या जाणाऱ्या 'केंद्रीय संसदीय मंडळावर' (Parliamentary Board) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नितीन गडकरींनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा ही बहुमानाची संधी मिळणार का? तीन विधानसभा निवडणुकांत सलग १०० हून अधिक जागा जिंकून देणाऱ्या फडणवीसांची ही दिल्लीवारी म्हणजे राष्ट्रीय राजकारणातील पहिलं पाऊल आहे, की महाराष्ट्रातून दूर करण्याचा पक्षांतर्गत गेमप्लॅन?