Beed - Dharashiv -Chhatrapati Sambhajinagar रेल्वे कॉरिडॉरला हिरवा कंदील

28 Jul 2026    17 Views

 

रेल्वे मंत्रालयाने धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सविस्तर सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मराठवाड्यात थेट रेल्वे संपर्क वाढणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच प्रवास आणि मालवाहतूक अधिक वेगवान व सुलभ होऊन संपूर्ण प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक LiDAR तंत्रज्ञान आणि डिजिटल मॅपिंगचा वापर करण्यात येणार असून त्यामुळे प्रकल्पाचे नियोजन अधिक अचूक आणि परिणामकारक होईल.हा रेल्वे कॉरिडॉर उभारल्यानंतर उद्योग, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच हजारो स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे मराठवाड्यातील आर्थिक विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.