Pune News भारतातील सर्वांत लांब 6 पदरी एलिव्हेटेड महामार्ग पुण्यात ....

26 Jul 2026    8 Views

 

Pune News भारतातील सर्वांत लांब 6 पदरी एलिव्हेटेड महामार्ग पुण्यात .…

भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक नवा सुवर्णअध्याय लिहिला जात आहे.  हो... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. भारतातील सर्वांत लांब सहापदरी एलिव्हेटेड महामार्ग आता महाराष्ट्रात, थेट पुण्यात साकारला जाणार आहे. पुण्यातून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी हा केवळ एक महामार्ग नाही, तर वर्षानुवर्षे सहन करावी लागणाऱ्या वाहतूक कोंडीवरचा एक मोठा उपाय ठरणार आहे. पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल 35 किलोमीटरचा सलग एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार असून, तो देशातील सर्वांत लांब सहापदरी उन्नत महामार्गांपैकी एक ठरणार आहे. या महामार्गाची रचना कशी असेल? तो इतका खास का आहे? प्रवासाचा वेळ नेमका किती कमी होणार? आणि या प्रकल्पामुळे पुणे तसेच मराठवाड्याच्या विकासाला किती मोठी चालना मिळणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.