Kupwad मध्ये कचरा टाकण्यावरून वाद-Farid Shaikh ने शेजारी Manisha Keskar यांना संपवलं

17 Aug 2026    12 Views

सांगली : कुपवाड परिसरात कचरा टाकण्याच्या वादातून झालेल्या कथित मारहाणीत मनीषा केसरकर यांचा मृत्यू, तर त्यांचे पती मोहन केसरकर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरीद शेख याला घटनेनंतर तातडीने अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कचरा टाकण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्यात मनीषा केसरकर गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन केसरकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.