Pune सह राज्यातील 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद, Uday Samant काय भूमिका घेणार..

01 Sep 2026    1 Views

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या वाटचालीसमोर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे रोजगार, उद्योगांचे स्थलांतर आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

विशेषतः पुणे, चाकण आणि हिंजवडी या महत्त्वाच्या औद्योगिक आणि आयटी केंद्रांनाही पायाभूत सुविधांची कमतरता, वाहतूक कोंडी आणि वाढता नागरी ताण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उद्योग बंद होण्यामागची नेमकी कारणे काय आहेत, नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासोबतच विद्यमान उद्योग राज्यात टिकवण्यासाठी सरकारची काय भूमिका असणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

36 हजारांहून अधिक कंपन्या बंद होण्याची आकडेवारी ही केवळ उद्योग क्षेत्रासाठीच नव्हे, तर रोजगाराच्या संधी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या आकडेवारीबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्याची आणि महाराष्ट्रातील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.