सरपंच Mangesh Sabale याना तडीपारीची नोटीस-Manoj Jarange यांच्या अनुषंगाने sabale यांचे सरकारवर आरोप

18 Aug 2026    14 Views

गेवराई पायगा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांतून हद्दपार का करू नये, याबाबत पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. साबळे यांच्यावर धमक्या देणे, बेकायदेशीर जमाव करणे, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच अधिकारी आणि स्थानिक व्यावसायिकांना धमकावल्यासारखे आरोप करण्यात आले आहेत.मात्र, मंगेश साबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपला सार्वजनिक प्रश्नांवरील आक्रमक पवित्रा आणि सामाजिक आंदोलनांमधील सक्रिय भूमिका यामुळेच राजकीय हेतूने ही कारवाई केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.