पुणेरी गाड्यांवर MH 12 कायम, पुणेकरांच्या अस्मितेचा विजय; RTO कोड बदलणार नाही

07 Aug 2026    2 Views

पुण्याची ओळख बनलेला MH 12 वाहन नोंदणी क्रमांक विद्यमान मालिका संपत आली असली तरी कायम ठेवला जाणार आहे. वाहन नोंदणीसाठीची सध्याची क्रमांक मालिका संपुष्टात येत असतानाही MH 12 हा ऐतिहासिक कोड बदलला जाणार नाही.

यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. त्यावर गडकरी यांनी MH 12 ही ऐतिहासिक ओळख कायम ठेवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

यानंतर परिवहन विभागाकडून MH 12 ही ओळख कायम ठेवत 1A सारखी नवीन अल्फान्यूमेरिक (अक्षर-अंक मिश्रित) मालिका सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातही पुण्यातील नव्या वाहनांची नोंदणी MH 12 या प्रतिष्ठित कोडखालीच होणार असून, शहराची ऐतिहासिक ओळख अबाधित राहणार आहे.