Mohol मध्ये राजकीय वाद पेटला-माजी आमदार Ramesh Kadam यांची Umesh Patil यांच्यावर टिका
01 Sep 2026 22 Viewsराष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने आता मोहोळच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर उमेश पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर माजी आमदार रमेश कदम यांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकेकाळी एकाच राजकीय गोटात असलेल्या रमेश कदम आणि उमेश पाटील यांच्यातील राजकीय समीकरणे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. मोहोळमधील राजकीय वर्चस्व, जुन्या राजकीय मतभेद आणि एकमेकांवर होणाऱ्या सातत्यपूर्ण टीकेमुळे दोघांमधील जुना संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेला उमेश पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर वेगळे वळण मिळाले. त्यानंतर रमेश कदम यांनी पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत तीव्र शब्दांत टीका केली.
त्यामुळे आता रमेश कदम यांच्या या ताज्या हल्ल्यानंतर उमेश पाटील काय उत्तर देणार? याकडे मोहोळसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.