Mumbai-Pune महामार्ग 6 पदरी होणार; पण टोलचा भार पुन्हा प्रवाशांच्या खिशावर

04 Aug 2026    6 Views

एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) ने जुन्या मुंबई–पुणे महामार्गाचे सहा पदरी (सिक्स-लेन) मार्गामध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 6,000 कोटी आहे.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवासाचा वेग व सुरक्षितता वाढवणे हा आहे.मात्र, या प्रकल्पामुळे टोल वसुलीचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने, त्याचा प्रवाशांवर आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांवर काय परिणाम होईल, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.