सिंगापूरच्या प्रसिद्ध कंपनीकडे ‘मुंबई 3.0’च्या आराखड्याची जबाबदारी.. 124 गावांचं नवं भविष्य ठरणार!

11 Aug 2026    12 Views

रायगड जिल्ह्यात ‘मुंबई 3.0’ या महत्त्वाकांक्षी शहरी विकास प्रकल्पाची उभारणी होणार आहे. पनवेल, उरण आणि पेण तालुक्यांतील तब्बल 124 गावांचा या प्रकल्पात समावेश असून, एकूण 323.44 चौ.किमी क्षेत्रात हा विकास आराखडा साकारला जाणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी सिंगापूरस्थित Surbana Jurong या कंपनीला देण्यात आली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे.