Karjat–Lonavala | Mumbai–Pune Railway साठी 26 KM आपत्कालीन रस्ता

27 Jul 2026    13 Views

मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत–लोणावळा दरम्यान रेल्वे रुळांना समांतर 26 किलोमीटरचा आपत्कालीन रस्ता उभारला जाणार आहे. पावसाळ्यात दरडी, भूस्खलन किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास मदत आणि दुरुस्ती पथकांना घटनास्थळी जलद पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढण्यासोबतच रेल्वे वाहतुकीतील अडथळेही कमी होण्याची अपेक्षा आहे.