Nagpur | सावजी मटणावरून वाद! तुकाराम मुंढेच्या विधानानंतर पुन्हा चर्चेत विदर्भाची अस्सल खाद्यपरंपरा
07 Aug 2026 11 Viewsनागपूरच्या प्रसिद्ध सावजी मटणवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका वक्तव्यानंतर या विषयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सावजी मटण अतितिखट आणि तेलकट असल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली असली तरी नागपूरकर आणि हल्बा-कोष्टी समाज यांचे म्हणणे आहे की, सावजी ही केवळ एक खाद्यसंस्कृती नसून ती त्यांच्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे.सुमारे १५० वर्षांचा इतिहास लाभलेल्या सावजी खाद्यसंस्कृतीची सुरुवात कशी झाली, तिची खास मसाल्यांची चव आणि पारंपरिक पाककला कशी विकसित झाली, तसेच विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून सावजी मटण आजही का ओळखले जाते, याचा सविस्तर आढावा या बातमीत घेण्यात आला आहे.