Nashik: 15 वर्षांचं प्रेम, तिसऱ्याची एंट्री अन् रक्तरंजित शेवट; मृतदेह कसारा घाटात फेकला

19 Aug 2026    7 Views

नाशिकमध्ये 15 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा धक्कादायक शेवट हत्येत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 39 वर्षीय वसंत सातपुते यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.या नात्यात आणखी एका पुरुषाची एंट्री झाल्यानंतर वाद वाढत गेले आणि त्यातूनच वसंत सातपुते यांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येनंतर मृतदेह तब्बल 18 तास घरातच ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.त्यानंतर मृतदेह कसारा घाटातील दरीत फेकण्यात आल्याचा आरोप आहे. एका ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी कसारा घाटातून मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.