Nashik–Pune हायस्पीड रेल्वेसाठी एल्गार, 9 ऑगस्टला चक्काजाम; Satyajeet Tambe ची घोषणा..
05 Aug 2026 11 Viewsनाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी मूळ नाशिक–सिन्नर–संगमनेर–जुन्नर–मंचर–पुणे हा मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी स्वरूपाच्या रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.नारायणगाव येथील जीएमआरटी (GMRT) रेडिओ दुर्बिणीशी संबंधित तांत्रिक अडचणी आणि अहिल्यानगर–शिर्डीमार्गे पर्यायी मार्गाच्या प्रस्तावामुळे हा मार्गाचा वाद अधिकच तीव्र झाला आहे. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर मूळ मार्गाचा पुनर्विचार करून तांत्रिक तोडगा काढण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.