Prashant Kishor यांचा NCP वर मोठा बॉम्ब? Sunil Tatkare यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह!

09 Aug 2026    11 Views

प्रशांत किशोर यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांसोबत घेतलेल्या कथित रणनीती बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक रचनेबाबत चिंता व्यक्त करताना विद्यमान राज्य नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वात बदल होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पार्थ पवार यांचा वाढता प्रभावही चर्चेचा विषय ठरत आहे.