Pune–Nashik Semi High-Speed Rail project साठी Anil Kakodkar समितीची एन्ट्री! 60 दिवसांत होणार निर्णय

09 Aug 2026    11 Views

पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. खोडदजवळील जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या GMRT (Giant Metrewave Radio Telescope) वेधशाळेच्या जवळून प्रस्तावित रेल्वे मार्ग गेल्यास वैज्ञानिक संशोधनावर कोणताही परिणाम होणार नाही ना, याचा समिती अभ्यास करणार आहे.