Pune News | पुणेकरांना मोठा दिलासा! 9 रेल्वे फाटकांवर उभारले जाणार ROB आणि RUB

25 Jul 2026    1 Views

Pune News | पुणेकरांना मोठा दिलासा! 9 रेल्वे फाटकांवर उभारले जाणार ROB आणि RUB

पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि रेल्वे फाटकांवरील अपघात कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारच्या रेल्वे क्रॉसिंग निर्मूलन उपक्रमांतर्गत पुण्यात नऊ महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये उड्डाणपूल (फ्लायओव्हर), भुयारी मार्ग (अंडरपास) आणि पादचारी पूल यांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प पुणे महानगरपालिका (PMC) आणि महारेल (MahaRail) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जाणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.