Pune | जमिनीखाली उतरणार पुणे! कोथरूड-सुतारदरा ते पाषाण 3 किमी भुयारी मार्गाचा नवा प्लॅन
17 Aug 2026 16 Viewsपुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी पुणे महानगरपालिका सुतारदारा-कोथरूड ते पाषाणदरम्यान भूमिगत बोगदा उभारण्याच्या सुधारित प्रकल्पावर काम करत आहे. प्रस्तावित बोगदा सुमारे 3 किलोमीटर लांब आणि 24 मीटर रुंद असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रकल्पाची अंतिम लांबी, रचना आणि खर्च तांत्रिक सर्वेक्षण तसेच सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (DPR) आधारे निश्चित केला जाणार आहे.
या प्रकल्पाच्या सुधारित मार्गात वेताळ टेकडी आणि पंचवटी परिसर टाळण्यात आला आहे. त्यामुळे वृक्षतोड, पर्यावरणीय नुकसान आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधाशी संबंधित अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.