Ravi Rana vs भाजपचे सगळे आमदार या वादात भाजपच राणांचा पत्ता कट करेल का?
10 Aug 2026 1 Viewsअमरावतीच्या राजकारणात आमदार रवी राणा आणि भाजप नेत्यांमधील वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. तिवसा मतदारसंघातील भाजप आमदार राजेश वानखडे यांचे तिकीट आपणच ठरवणार असल्याचा दावा रवी राणा यांनी केल्यानंतर भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. आमदार राजेश वानखडे, प्रवीण पोटे आणि जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन रवी राणांना भाजपच्या कारभारात लुडबूड न करण्याचा कडक इशारा दिला आहे.