Jayant Patil आणि Gopichand Padalkar यांच्या वादात सांगली जिल्हा बँकेवर कोण मारणार बाजी?| Sangli DCC

15 Aug 2026    11 Views

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच सांगलीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी जत आणि आटपाडी तालुक्यातील ठरावांवरून गोपीचंद पडळकरांवर 'सहकारात गुन्हेगारी अन् दमदाटी' सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे पडळकर अन् सदाभाऊ खोत यांनी बँकेतील १६.५९ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ५७ जणांवर दोषारोपपत्र आणून जयंत पाटलांची कोंडी केली आहे. त्यातच सहकार कायद्यातील १० वर्षांच्या नियमामुळे विशाल पाटील, मानसिंगराव नाईकांसह ८ दिग्गज बाहेर पडले आहेत. नक्की काय आहे सांगली बँकेचे सत्ताकारण? पहा 'कट टू कट' सविस्तर विश्लेषण.