Vidyanand Bapat : टीव्ही सुद्धा हेडफोन लावून बघतो; ‘हा’ प्रकार पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
09 Sep 2026 5 Viewsगणेशोत्सवासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवत रान पेटवले. त्यांच्या या मोहिमेला सुजाण पुणेकरांनीही मोठा पाठिंबा दिला. या मागणीची दखल घेत राज्यातील अनेक शहरांमध्ये पोलिस प्रशासनाने डीजे आणि मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिमविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या स्पष्टवक्त्या मराठीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या याच भूमिकेवर आणि कर्णकर्कश आवाजाच्या समस्येवर आजचा विशेष ‘कट टू कट पॉडकास्ट’.