NEET पेपरफुटी प्रकरण : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
26 Jul 2026 3 Views राजकीयनवी दिल्ली | २५ जुलै : NEET पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून दिल्लीत आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला विद्यार्थी आणि विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलै रोजी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले.फडणवीस म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे लागू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पीएम श्री शाळा उपक्रम, आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षा १९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणा त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आल्या.
"राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारा निर्णय"
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,
"धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक ऐतिहासिक आणि दूरगामी सुधारणा घडवून आणल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, पीएम श्री शाळांचा उपक्रम, आयआयटींचा विस्तार तसेच प्रवेश परीक्षा १९ भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. व्यापक जनहिताची भावना जपत त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे, हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे."
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर झालेला हा राजीनामा देशाच्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची घडामोड मानली जात असून, यापुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.