पुण्यात राहुल गांधींसोबत सेल्फी घेतल्यानंतर तरुणीने गालावर केलं किस; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
25 Aug 2026 4 Views ताज्या बातम्या: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला पुण्यात विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिक्षण, रोजगार आणि तरुणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमातील भाषणांसोबतच एका अनपेक्षित प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मंचावरून खाली उतरत होते. यावेळी काही विद्यार्थी आणि तरुण-तरुणी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आले. त्याचवेळी हिरवी पँट आणि काळा टी-शर्ट परिधान केलेली एक तरुणी मोबाईल हातात घेऊन राहुल गांधी यांच्या जवळ आली.
राहुल गांधी यांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पोज दिली. त्यांच्या एका हातात माईक होता, तर दुसऱ्या हाताने त्यांनी त्या तरुणीच्या खांद्यावर हात ठेवला होता. सेल्फी घेतल्यानंतर त्या तरुणीने अचानक राहुल गांधी यांच्या गालावर किस केलं. या अनपेक्षित प्रसंगानंतर राहुल गांधी यांनीही संयमाने प्रतिक्रिया दिली आणि त्या तरुणीशी संवाद साधल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर वेगाने पसरला. अनेकांनी हा प्रसंग शेअर करत विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी तरुणीने राहुल गांधींबद्दल व्यक्त केलेला आदर आणि आपुलकी म्हणून या घटनेकडे पाहिलं आहे. तर काहींनी या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळ येण्याची संधी मिळाल्याने कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणी राहुल गांधी यांच्या अगदी जवळ जाताना दिसत असल्याने काही युजर्सनी व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे हा होता. शिक्षणव्यवस्था, रोजगाराच्या संधी आणि तरुणांच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नांवर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या कार्यक्रमाला पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर घडलेल्या या अनपेक्षित प्रसंगाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या राहुल गांधी आणि तरुणीचा सेल्फी तसेच त्यानंतर घडलेला किसचा प्रसंग असलेला व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या घटनेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.